जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील पाटीलवाडा येथे एकाच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना शुक्रवार ७ जून रोजी मध्यरात्री दीड वाजता घडली. याप्रकरणी सकाळी ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धर्मा गोपीचंद वायकर वय-४८, रा.दापोरा ता. जि. जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. खाजगी नोकरी करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान त्यांची दुचाकी (एमएच १९ डीसी ६८५७) ही त्यांच्या घरासमोर रात्री पार्किंगला लावली होती. शुक्रवार ७ जून रोजी मध्यरात्री १०.३० वाजता गजानन गोरख पाटील रा.आव्हाने ता. जळगाव यांनी दुचाकीवर पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. यामध्ये दुचाकी जळून खाक झाले आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता धर्मा वायकर यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक शिरसाठ हे करीत आहे.