दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आज १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. याच रक्षाबंधनाच्या सणाला आमदार भावना गवळी यांनी देखील देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आहे.
काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार भावना गवळी यांना तिकीट न मिळाल्याने त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार देण्यात आली होती. त्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे दोन दिवसापूर्वी भावना गवळी या दिल्ली येथे असताना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार भावना गवळी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा हा पवित्र सण साजरा केला आहे.