Home क्राईम हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना तरूणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली !

हळदीच्या कार्यक्रमात नाचतांना तरूणाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली !


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लग्नाच्या आनंदाला गालबोट लागल्याची एक धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे समोर आली आहे. हळदीच्या कार्यक्रमात डान्स करत असताना झालेल्या किरकोळ धक्क्याचे रूपांतर हाणामारीत होऊन एका तरुणावर बिअरच्या बाटलीने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे सामेवारी २३ मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एका हळदीचा कार्यक्रम सुरू असतांना मयूर दत्तू चौधरी (वय-२४) हा तरुण आपल्या मित्रांसोबत डान्स करत होता. डान्स करत असताना त्याचा धक्का तेथे असलेल्या संशयित आरोपी पवन खाटीक रा. लोहारा ता. पाचोरा याला लागला. या क्षुल्लक कारणावरून मयूरला संशयित आरोपी पवन याने डोक्यात, छातीवर आणि हातावर बिअरची बाटली फोडून जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार शैलेश चव्हाण करत आहेत.


Protected Content

Play sound