Home Cities अमळनेर विषारी औषध घेतल्याने ७६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू

विषारी औषध घेतल्याने ७६ वर्षीय वृध्दाचा मृत्यू


अमळनेर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । विषारी औषध घेतल्याने अमळनेर तालुक्यातील खेडी गावातील ७६ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यशवंत धुडकू पाटील वय ७६ रा. खेडी ता. अमळनेर असे मयत झालेल्या वृध्दाचे नाव आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील खेडी गावात यशवंत पाटील हे वृध्द आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. ४ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता त्यांनी राहत्या घरी विषारी औषध घेतले होते. त्यामुळे त्यांना अमळनेर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना तातडीने धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असतांना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी रविवारी २१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound