जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सवोत्तम नगरातील कला भवन समोरील घरात ३८ वर्षीय तरूणाने आज दुपारी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कल्लूसिग प्रजापती कुशावह (वय-३८) रा. कला भवन समोर, सर्वोत्तम नगर, जळगाव असे मृत तरूणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, “कल्लूसिंग कुशावह हा मोठा भाऊ व वाहिनीसोबत सर्वोतम नगरात वास्तव्याला होता. पाणीपुरीची गाडी लावून आपला उदरनिर्वाह करत होता.
आज शुक्रवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता कल्लूसिंगचा भाऊ हा पाणीपुरीची गाडी घेवून बाहेर निघून गेला. त्यावेळी कल्लूसिंग हा घरात एकटाच होता. राहत्या घरात त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
कल्लूसिंगचा मोठा भाऊ हा काही कामानिमित्त घरी आला असता त्याला भावाने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूी नोंद करण्यात आली आहे.