रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘तु माझ आयुष्य बर्बाद केले’ असे म्हणत एका २८ वर्षीय महिलेन ३० वर्षीय तरुणाला गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील बोहर्डे येथे घडली आहे. या प्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे आहे की बोहर्डे (ता. रावेर) येथील मराठी मुलांच्या शाळेच्या मैदानावर रविवारी २८ जानेवारी रोजी जितेंद्र एकनाथ पाटील (वय ३०) हा उभा होता.
यावेळी आरोपी महिला अंकिता संदीप पाटील ही अचानक तेथे आली. जितेंद्र यास म्हणाली कि ‘तू माझ आयुष्य बर्बाद केले’ असे बोलून पिशवीतून विळा काढून जितेंद्रच्या डाव्या हाताच्या मनगटावर व डोक्याच्या मागील बाजूस विळ्याने वार करून गंभीर जखमी केले. यावेळी हे भांडण सोडवण्यासाठी जितेंद्रची वहिनी सुनीता पाटील आली असता आरोपी हीने तिच्यावर सुध्दा विळ्याचा वार करून जखमी केले. या बाबत जितेंद्र पाटील याच्या फिर्यादी वरुन आरोपी महिलेविरुध्द प्राणघातक हल्ला करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी महिलेस पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलिस घनश्याम तांबे करीत आहे.