Home क्राईम भरधाव पीकअप वाहनाच्या धडकेत १० वर्षीय चिमुकला जखमी !

भरधाव पीकअप वाहनाच्या धडकेत १० वर्षीय चिमुकला जखमी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात एका भरधाव पिकअप गाडीने १० वर्षीय बालकाला जोरदार धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातात बालक गंभीर जखमी झाले असून, अपघात करून चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी इंद्रा मोहन सोळंकी (वय ४०, रा. रायपूर फाटा, जळगाव) यांचा १० वर्षांचा मुलगा रामा मोहन सोळंकी हा २३ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता एमआयडीसी ‘व्ही’ सेक्टरमधील हर्शल इंडस्ट्रीजसमोरील रस्त्यावरून चालत घरी येत होता. यावेळी समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने (क्रमांक MH-19 CY 5330) त्याला जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात रामा सोळंकी याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. विशेष म्हणजे, अपघात घडल्यानंतर संबंधित पिकअप चालकाने जखमी मुलाला कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तिथून पळ काढला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound