जळगाव प्रतिनिधी । आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात बैठक घेण्यात आली. होणाऱ्या निवडणुकीत पक्षांतर्गत कार्यकर्त्यांना शासकीय योजनांचा लाभ कसा मिळावा यासह प्रचार व प्रसार करण्याकरीत निवडणूक प्रचारात कशी माहिती देण्यात यावी यासाठी आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणूकीत भाजपाचा उमेदवार यावा यासाठी भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना झोकून कामे करावे असे आवाहन पक्षाचे वरीष्ठ नेते यांनी केले. यावेळी आमदार राजूमामा भोळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी प्रस्थाविक मांडले. भाजपा सरचिटणीस दिपक सुर्यवंशी यांनी आपल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी या बैठकीस संघटन सरचिटणीस तथा नगरसेवक विशाल त्रिपाठी, भाजपा उपगटनेते तथा सरचिटणीस राजेंद्र घुगे पाटील, महेश जोशी, भाजयुमो सरचिटणीस भुपेश कुलकर्णी, जितेंद्र चौथे, आनंद सपकाळे, उपाध्यक्ष महेश पाटील, रियाज शेख, हेमंत भंगाळे, चिटणीस वैभव चौधरी, योगेश बागडे, प्रसिद्धी प्रमुख हर्षल नेवे, कार्यालय मंत्री रमेश मौर्य, मंडळाध्यक्ष दिनेश पुरोहित, उज्वल सोनवणे, चेतन तिवारी, ऋषिकेश येवले, योगेश गोसावी, शाम पाटील, मंडल सरचिटणीस रुपेश राणे, विनय चौधरी, आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.