उद्यापासून २० नोव्हेम्बरपर्यंत शाळांना दिवाळीची सुटी

मुंबई : वृत्तसंस्था । शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी उद्यापासून म्हणजेच ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. त्यामुळे कित्येक महिने विद्यार्थी शाळेत गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत यंदा दिवाळीची सुट्टी असणार का? असा प्रश्न विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना पडला होता. वर्षा गायकवाड यांनी शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून दिवाळीची सुट्टी मिळणार आहे हे जाहीर केलं. मात्र आधी पाचच दिवसांची सुट्टी दिल्याने अनेकजण हिरमुसले होते. आता मात्र ही सुट्टी २० नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

कोरोना आणि लॉकडाउन या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थी, शिक्षक व पालकही अध्ययन आणि अध्यापन प्रक्रियेत गुंतले होते. दरवर्षी दिवाळीची सुट्टी २१ दिवसांची असते. मात्र यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा उशिरा उघडल्याने दिवाळीची सुट्टी कमी करण्यात आली.

Protected Content