जळगाव प्रतिनिधी । शहरातील जुन्या बसस्थानकाजवळ मटका, जुगार, सट्ट्यावर पोलीसांनी धाड टाकून तीन जणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलीसांनी तिघांच्या ताब्यातील सुमारे ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, जुन्या बसस्थानकाजवळ असलेल्या लॉटरीच्या तीन दुकानांमध्ये आकडा, सट्टा, जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास धाड टाकली. यात धाडीत सट्टा, ऑनलाईन आकडा खेळण्याचे साहित्य, इेलेक्ट्रॉनिक वस्तू, कॉम्प्यूटर रोख रकमेसह सुमारे ५० हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत जुने बसस्थानकाजवळ साई लॉटरी दुकानावर संशयित आरोपी संतोष शांताराम सोनवणे (वय-४२) रा. शनिपेठ, रिथुरवाड यांच्या ताब्यातून ८५० रूपये रोख, चार प्रिंटर, कॉम्प्यूटर, मॉनिटर साहित्या असाएकुण १९ हजार २५० रूपयांचा माल जमा केला. दुसऱ्या कारवाईत गजानन लॉटरी दुकानावर संशयित आरोपी रितेश सुभाष पांडे (वय-४७, रा. इश्वर कॉलनी) यांच्या ताब्यातील ४ हजार ५० रूपये रोख आणि सट्टा खेळण्याच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकुण १७ हजार ५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला तर तिसऱ्या कारवाईत बालाजी लॉटरी दुकानावर रात्री ८ वाजता संशयित आरोपी विजय नारायण वाणी (वय-५८) रा. नवीपेठ याच्याकडून २ हजार ४६० रूपये रोख आणि कंम्प्यूटर, सट्टा जुगार खेळण्याची साहित्ये असा एकुण १४ हजार ५६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीन ठिकाणी केल्या कारवाईत एकुण ५० हजार ८६० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नांदुरकर, सपोनि दिपक बिरारी, स.फौ. वासुदेव सोनवणे, पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गिते, तेजस मराठे, पो.ना. भास्कर ठाकरे, पो.कॉ. प्रणेश ठाकूर, पो.कॉ. ओमप्रकाश पंचलिंग यांनी कारवाई केली.