जळगाव (प्रतिनिधी) । शहर पोलीस स्थानकात गेल्या महिन्यात 18 फेब्रुवारी 2019 रोजी दाखल असलेल्या गुन्ह्यातील प्रमुख संशयिताच्या मुसक्या आवळण्यात शहर पोलीसांना कर्मचाऱ्यांना यश आले असून त्याला मालेगाव येथून पथकाने त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत माहिती अशी की,18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 ते 9.30 वाजेच्या दरम्यान शहरातील शिवाजीनगर स्मशानभुमीजवळ झालेल्या हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी शहर पोलीसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील एक आरोपी अल्ताफ रेहमान शेख उर्फ पट्या याला अटक करण्यात आली होती. तर दुसरा फरार झाला होता. मात्र फरार आरोपी असलेला प्रमुख संशयीत अझरोद्दीन उर्फ अज्जू गयासोद्दीन शेख रा.गेंदालाल मील याला मालेगाव येथे असल्याची गुप्त माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलीस स्थानकाचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय पाटील, अक्रम शेख, इमरान सैय्यद, प्रणेश ठाकूर यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारी मालेगाव येथून अझरोद्दीन उर्फ अज्जू गयासोद्दीन शेख याच्या मुसक्या आवळल्या.