नवी दिल्ली, वृत्तसंस्था । बँक किंवा इतर सरकारी कामांसाठीही पॅन कार्ड महत्त्वाचं मानलं जातं. पॅन कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा इतर कोणतीही माहिती अपडेट करायाची असल्यास, बाहेर कोणत्याही सेंटरमध्ये जाण्याची गरज लागणार नाही. घरबसल्या. ऑनलाईन पद्धतीने पॅन कार्ड अपडेट करता येणार आहे.
आधी NSDL या अधिकृत वेबसाईटवर सर्व्हिस टॅबवर जाऊन PAN वर क्लिक करा. त्यानंतर Changes or Correction in existing PAN Data / Reprint of PAN Card वर क्लिक करा. मागितलेली माहिती भरुन, कॅप्चा कोड सबमिड करा.
त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करा e-KYC द्वारे कागदपत्र जमा करण्यासाठी आधारकार्डची गरज लागेल. e-sign द्वारे स्कॅन फोटो सबमिट करू शकता. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट करावं लागेल. पेमेंट करण्यासाठी Pay Confirm वर क्लिक करा. पेमेंट केल्यानंतर बँक रेफरेंस नंबर आणि ट्रान्झक्शन नंबर मिळेल. हे दोन्ही सेव्ह करून continue वर क्लिक करा.त्यानंतर आधार कार्डच्या खालच्या बॉक्सवर टिक करा आणि Authenticateवर क्लिक करा. त्यानंतर continue with e-Sign आणि e-KYC वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर Generate OTP वर क्लिक करा.-
OTP टाकून सबमिट केल्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, त्यात ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल. PDF फॉर्मेटमध्ये तो डाऊनलोड करा. तसंच मेलवरही फॉर्म मिळेल. आयडी प्रूफ सर्व कागदपत्र NSDL e-Gov ऑफिसमध्ये पाठवावे लागतील.