यावल ( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिल देशमुख हे नुकतेच जिल्हा दौऱ्यावर आले असतांना रावेर येथे जात असतांना त्यांना बामणोद येथे थांबवून हिगोंणा येथील शेतकऱ्यांची झालेली फसवणूकीसंदर्भात निवेदन देण्यात आले.
त्या गैरव्यवहाराची चौकशी करून त्या पीडित शेतकऱ्याला गृहमंत्री यांनी न्याय मिळुन द्यावा व गैरव्यवहार करणाऱ्या व्यक्तीला फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी आणी त्या शेतकऱ्याला त्याची शेत जमीन परत देण्यात यावी ही भूमिका मांडली या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत निळ,युवा ब्रिगेडियर्स फाऊंडेशन जिल्हा सचिव भरत चौधरी. गिरिष गुरव,भावेश सोनवणे,राजू लोहार,किरण सोनवणे,मुकेश बडुगे दिपक मराठे,कुष्णल निळ, योगेश पाटील आदी उपस्थित होते .यावेळी ना .अनिल देशमुख यांनी या विषयात आपण विशेष लक्ष देणार असल्याचे आहे .