Home Cities जळगाव रावेरात गृहमंत्री आणि एकनाथराव खडसे यांची भेट

रावेरात गृहमंत्री आणि एकनाथराव खडसे यांची भेट

0
34


रावेर : शालिक महाजन । गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू असताना आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी बोरखेडा येथील पीडितेच्या कुटुंबीयांची गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे

काल रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्येमुळे समाजमन सुन्न झाले असून सर्वत्र प्रचंड खळबळ उडालेली आहे कालच पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील, माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, खासदार रक्षाताई खडसे , जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.

कालच माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी या गुन्ह्यात कठोर पावले उचलत चौकशीची मागणी केली होती. दरम्यान आज गृहमंत्री अनिल देशमुख हे पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी बोरखेडा येथे दाखल झाले आहेत योगायोगाची बाब म्हणजे एकनाथराव खडसे हे सुद्धा याच वेळी बोरखेडा येथे दाखल झाले खरंतर ही राजकीय भेट नव्हे ; एका दुःखाच्या प्रसंगात हे दोन्ही नेते भेटत आहेत पण या दोन्ही नेत्यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्याची साधलेली वेळ ही आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेली आहे


Protected Content

Play sound