भडगाव (प्रतिनिधी) येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आज शेवटच्या दिवशी शिवसेनेचे अतुल रमेश पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल होता. त्यामुळे अतुल पाटील यांची नगराध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत अधिक असे की , राजेंद्र पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त पदासाठी निवडीचा कार्यक्रम लागला होता. दि 12 व 13 रोजी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख होती. भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्याकडे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती. परंतु आज शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेचे अतुल पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध नगराध्यक्ष पदी निवड झाली. या वेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, उपनगराध्यक्ष वसीम मिर्झा, प्रतापराव पाटील, शिवसेना शहरप्रमुख मनोहर चौधरी, दिनकर देवरे, नगरसेविका रजंनाताई पाटील, करुणाताई देशमुख, युवराज पाटील, शशिकांत येवले, शकंर मारवाडी, नगरसेवक डॉ प्रमोद पाटील, माजी उपनगराध्यक्ष आनद जैन, शांताराम आप्पा पाटील, सुनिल देशमुख, जे. के. पाटील, भाउसाहेब पाटील, प्रदीप महाजन, लखीचंद पाटील, आबा चौधरी, निलेश पाटील, बापु पाटील, रमेश भदाणे, दादाभाऊ भोई, रुषी पाटील, शामराव पाटील, आदीसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.