रावेर : प्रतिनिधी । तालुक्यात रस्त्याची झालेली चाळणी, ऑनलाइन बैठकीला अधिका-यांची दांडी व शेतक-यांच्या प्रश्नावरुन रावेर पंचायत समितीची मासिक बैठक चांगली गाजली . सभापती जितु पाटील यांनी तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव संमत करून घेतला .
आज रावेर पंचायत समितीची मासिक बैठक ऑनलाईन घेण्यात आली यावेळी प्रत्येक मिटिंगला दांड्या मारणार्या अधिका-यांनी त्यांची परंपरा खंडीत न करता ऑनलाईन बैठकीला सुध्दा दांड्या मारल्याने सदस्य प्रचंड नाराज झाले बैठकीत रावेर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव करण्यात आला.
विम्याचे निकष पूर्वी प्रमाणे ठेवण्याची व ज्वारी मका खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी सदस्यांनी केली बैठकीला पंचायत समिती सदस्य पि के महाजन यांच्यासह पुर्नवसन विभाग व जबाबदार अधिका-यांनी दांड्या मारल्या होत्या
या मासिक बैठकीत सभापती जितु पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, सदस्य दिपक पाटील, योगेश पाटील, सौ धनश्री सावळे, योगिता वानखेडे, कविता कोळी, माधुरी नेमाडे, अनिता चौधरी, प्रतिभा बोरोले, रुपाली कोळी यांनी ऑनलाइन तालुक्याच्या समस्या मांडल्या बैठकीचे कामकाज गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी पाहीले.