यावल, प्रतिनिधी । उत्तर प्रदेशात हाथरस येथे एका दलित मुलींवर सामूहिक अत्याचार व मरणासन्न अवस्थेत सोडून दिल्यानंतर या आरोपीना तेथील योगी सरकारने त्या नराधमांना पाठीशी घातले आहे. असे योगी सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी सातपुडा वाल्मीकी मेहतर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाचा आशय असा की, उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे झालेल्या दलित मुलींवर सामुहिक अत्याचार व हत्या करण्याचा प्रयत्न घटना ही संपुर्ण देशवासीयांच्या मनाला हेलावणारी असुन अत्यंत अमानुष तित्या घडलेल्या सामुहीक बलात्कार व अत्याचाराची व देशाच्या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना हाथरस येथे घडली असुन या घृणास्पद व निंदनीय प्रकारातील आरोपींना योगीचे गुंडाराज सरकार पाठीशी घातल असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या असुन उतरप्रदेशातील गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या योगी यांचे सरकार तात्काळ बरखास्त करून राष्ट्रपती शासन उतरप्रदेश मध्ये लावण्यात यावे आणी या संपुर्ण देशाला हादरून सोडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी. उत्तर प्रदेश मधील योगीचे गुंडाराज शासन हे या गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालुन वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसुन येत असुन , या गुन्ह्यातील नराधम आरोपींवर अॅट्रासिटी अॅक्टनुसार कारवाई करण्यात यावी व गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक न्यायलयात चालविण्यात यावा व यातील गुन्हेगार नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांना नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी , माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल . वसंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनावर सातपुडा वाल्मीकी मेहतर समाज संस्थेचे अध्यक्ष गोपाळ सितुजी घारू , सचिव जुगल घारू,रूपचंद धारू ,लखीचंद देवराव बारेला , नरेन्द्र दुर्गादास चव्हाण, अशोक गणेश धारू , संजय घारू , मयुर घारू, अजय नेमीचंद सारसार आदीच्या स्वाक्षरी आहेत.