मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी द्या; भुसावळात तहसीलदारांना निवेदन (व्हिडीओ)

भुसावळ प्रतिनिधी । उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील गुन्हेगारांना पकडून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी भुसावळ येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्यावतीने आंदोलन करण्यात आले. विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे देशभरात सर्वस्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. हाथरस येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी भुसावळात राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने भुसावळ तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या घटनेतील आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला शहर अध्यक्ष नंदा प्रकाश निकम, राजीयाबी सलिम, रचना यादव, वनिता गाजरे, ललिता अंबोरे, राजिया सुभान शेख, परविन पिंजारी, अमीनाबी गुलामनबी पिंजारी, निलोफर नाशीर, रईदाबी शेख रमजान, रना परविन यांच्यासह आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/367127227776794/

Protected Content