पाचोरा (प्रतिनिधी) येथील अवैध गुटखा विक्री कारवाईत ४० ते ५० हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. येथील पोलीस कर्मचारी राहुल सोनवणे व प्रशांत चौधरी यांना आज सकाळी १०३० वाजेच्या सुमारास एक फेरीवाला विक्रेता एका पान टपरीवर गुटख्याच्या माल विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
यानुसार पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राहुल बेहरे व नरेंद्र शिंदे यांच्यासह तत्काळ कारवाई करून शहरातील आठवडेबाजार भागातून त्याला ताब्यात घेतले आणि त्याच्याजवळ असलेला माल जप्त केला. त्यानंतर चौकशीअंती त्याच्या सिंधी कॉलनी भागातील घरातून ३० ते ४० हजारांचा अवैधरित्या साठवलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. सदर अनोळखी व्यक्तीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.