कोल्हापूर । धनगर समाजाने आरक्षणासाठी अतिशय आक्रमक पवित्रा घेतला असतांनाच आता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी या मागणीला पाठींबा दिला आहे.
माजी गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी आज संभाजीराजे यांची भेट घेतली. ‘आपण मराठा आरक्षणाच्या चळवळीचे नेते आहात; परंतु आमच्या धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देण्याची भूमिका तुम्ही जाहीर करावी,’ अशी विनंती शिंदे यांनी त्यांना यावेळी चर्चेत केली. या प्रसंगी राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाची व्याख्या करतानाच धनगर बांधवांचाही त्यात समावेश करून त्यांना त्यावेळी आरक्षण दिलेले होते. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जसा माझा लढा आहे, तसाच तो धनगर समाजासाठीही असणार आहे, अशा शब्दांत खासदार संभाजीराजे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा दिला.
संभाजीराजे म्हणाले, धनगर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापुरात गोलमेज परिषद घेण्यात आली. मला आनंद आहे की, संयोजकांनी यासाठी कोल्हापूरची निवड केली. कारण ही राजर्षी शाहू महाराजांची भूमी आहे, वारसा आहे. शाहू महाराजांनी जे बहुजन समाजाला आरक्षण दिले त्यात एस.टी., एन. टी., ओबीसी, मराठा समाजाचा समावेश होता. शाहू महाराजांनी जनकबहीण चंद्रप्रभा घाटगे यांचा विवाह यशवंतराव होळकर यांच्याशी केला. ती नाळ त्या वेळेपासून जुळलेली आहे. धनगर समाज हा प्रामाणिक आहे. त्यामुळे शाहू महाराजांनी जशी त्यावेळी या समाजाविषयी जबाबदारी पार पाडली, तशीच ती आमचीही जबाबदारी आहे.
तर कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद झाली, आरक्षणाचे जनक शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांचा वारसा छत्रपती संभाजीराजे चालवतायेत, मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे. मराठा समाजाचा प्रश्न सोडवण्यासाठी छत्रपती संभाजीराजे पुढाकार घेत आहेत, त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणावरही संभाजीराजेंनी लक्ष घालावं, मराठा आरक्षणासोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन सं