यावल प्रतिनिधी । शिवथाली योजनेच्या शिफारस करून ठेका देण्याच्या कारणावरून एका राष्ट्रीय पक्षाच्या कार्यकर्त्याने अरेरावी भाषा वापरून ‘हुज्जत’ घातल्याचे प्रकार बुधवारी घडला होता. या घटनेच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालयात महसुल कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन केले. याप्रकरणी तहसीलदार यांच्या फिर्यादीवरून कार्यकर्त्यावर यावल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी शासनाने मोल मजुरी करून हातावर पोट भरणाऱ्या अल्पदरात पोटभर जेवण या उद्देशाने शिव भोजन थाली ही योजना सुरू केली असुन, यावल तालुक्यातील फैजपुर आणि यावल शहरासाठी प्रत्येकी एक-एक शिव भोजन थाली केंद्र मंजुर केले असुन, यातील यावलचे केंद्र हे मंजुर झाल्यापासुन विविध विषयांना घेवुन गोंधळात सापडले आहे. या केंद्राच्या विरोधात पुंडलीक बाजीराव बारी यांनी तक्रारी आहे. यासाठी तक्रारदार काल ३० सप्टेंबर रोजी पुंडलीक बारी हे तहसील कार्यालयात गेले व तहसीलदार जितेंद्र कुंवर यांची भेट घेवुन शिवभोजन थाली केंद्राची तुम्ही शिफारस केल्याबद्दल बोलुन या भोजन केन्द्राची चौकशी करून कारवाई करण्याबाबत महसुल प्रशासनाच्या वतीने समाधान पुर्वक कारवाई केली नसल्याचे सांगितले. दरम्यान, त्या कार्यकर्त्याने तहसीलदार जितेंद्र कुवर यांच्याशी बेशिस्त वागणुक देवुन अरेरावी करत हुज्जत घातली.
याप्रकाराबद्दल आज महसुल विभागातील कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून कामबंद आंदोलन केले. दरम्यान, हुज्जत घालणाऱ्या पुडलिक बारी यांच्याविरोधात तहसीलदार कुंवर यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.