Home Cities भुसावळ भुसावळात गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक

भुसावळात गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास अटक


bhusawal Crime

भुसावळ (प्रतिनिधी)। शहरातील नहाटा चौफुलीजवळ एका हॉटेल जवळ बेकायदेशीर गावठी बनावटीची पिस्टल घेऊन फिरत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकाला गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने करवाई करत गावठी पिस्टलसह एकाला ताब्यात घेतले. याप्रकरणी बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाब माहिती अशी की, आरोपी सचिन पांडुरंग पारधी रा. मोढाळा ता. भुसावळ हा नहाटा चौफुलीजवळील जामनेर रोडला असलेल्या घासीलाल वडेवाला यांच्या हॉटेलवर बसलेल्या एका व्यक्तीकडे गावठी बनावटीची पिस्तूल असल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार बाजारपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस नाईक सुनील थोरात, पोलीस नाईक, प्रशांत चव्हाण, निलेश बाविस्कर, उमाकांत पाटील, योगेश माळी, संदीप राजपूत आणि दीपक जाधव यांनी सापडा रचत हॉटेलवर जाऊन चौकशी करत असताना सचिन पारधी यांच्याकडे गावठी पिस्टल मिळून आले. ही पिस्टल 10 हजार रूपयाची अंदाजित किंमत असल्याची पोलीसांनी कळविले आहे. याबाबत बाजारपेठ पोलिसात संशयित आरोपी सचिन पांडुरंग पारधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound