Home क्राईम धुमस्टाईल महिलेची गळ्यातील सोन्याची मंगलपोत लंपास

धुमस्टाईल महिलेची गळ्यातील सोन्याची मंगलपोत लंपास

0
86
chain snatching

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंद नगर रोडवरील चर्च जवळून महिला रात्री शतपावली करत असतांना समोरून दोन अज्ञात तरूणांनी दुचाकीने येवून गळतील मंगळसुत्र ओढून पसार झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील गजानन हॉऊसिंग सोसायटीतील रहिवाशी पांडूरंग पुरूषोत्तम बडे यांची पत्नी लता बढे या सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शतपावली करत असतांना समोरून दुचाकीने येणाऱ्या दोन तरूणांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची ४० हजार रूपये किंमतीचे मंगळसुत्र जबरी ओढून तोडून घेवून पसार झाले. पांडूरंग बडे यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.


Protected Content

Play sound