रावेर येथे राष्ट्रवादी पदवीधर संघातर्फे रक्तदान महाअभियान शिबिर

 

रावेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रावेरात आज राष्ट्रवादी पदवीधर संघाच्या वतीने राज्यव्यापी रक्तदान महाअभियान शिबिराच आयोजन करण्यात आले आहे.याच उदघाटन आज तालुक्यातील पदाधिका-यांच्या हस्ते संपन्न झाले.

रावेर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये आयोजित राष्ट्रवादी पदवीधर संघांच्या वतीने राज्यव्यापी रक्तदान महाअभियान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. रक्तसंकल डॉ उल्हास पाटील मेडीकल कॉलेजची टीम करणार आहे. यावेळी राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रशांत पाटील, संभाजी बिग्रेडचे अध्यक्ष घनश्याम पाटील, राष्ट्रवादी पदविधरचे अध्यक्ष किरण पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास ताठे, प. स. सदस्य योगेश पाटील, योगराज महाजन, किशोर पाटील, प्रणित महाजन, सचिन पाटील आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content