Home Cities एरंडोल कासोदा येथे बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त; एकाला अटक

कासोदा येथे बनावट देशी दारूचा कारखाना उध्वस्त; एकाला अटक

0
40

जळगाव प्रतिनिधी । राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी कासोदा ता. एरंडोल येथे बनावट देशी मद्यनिर्मितीचा कारखाना उद्वस्थ केला तर चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यात एकाला अटक करण्यात आली असून एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, कासोदा येथे बनावट देशी मद्य तयार करून ते मालवाहू टेम्पो मधून इतर गावांमध्ये पोहोचविले जात असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांना मिळाली होती. त्यानुसार झावरे यांनी भरारी पथकाचे निरीक्षक एस.एफ ठेंगळे, दुय्यम निरीक्षक ए.एस.पाटील, कॉन्स्टेबल एन. पी. पाटील, ए.व्ही.गावंडे, एम.डी. पाटील, के. पी. सोनवणे व आर.पी. सोनवणे यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना केल्या होत्या.

या पथकाने शनिवारी सकाळी कासोदा- कनाशी रस्त्यावर नाल्याकाठी सुरु असलेला दारूचा कारखाना उध्वस्त केला. संशयित आरोपी राहूल अनिल चौधरी ( रा. कासोदा) याला पथकाने अटक केली असून यावेळी दारुचे १४ बॉक्स, लेबल्स, बूच रिकाम्या बाटल्या व टेम्पो असा ३ लाख ६९ हजार ४७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित राहूल याला एरंडोल न्यायालयात हजर करण्यात आले.


Protected Content

Play sound