मुंबई,वृत्तसंस्था । नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून बॉलिवूडमधील अभिनेत्रींची चौकशी सुरू असून यात अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने ड्रग चॅटबाबत कबुली दिली आहे.
दीपिका पदुकोणने ड्रग चॅटची कबुली दिली आहे. त्याचप्रमाणे तिने Coco क्लबसंदर्भातील बाब देखील मान्य केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. 2017 चे हे चॅट होते, ज्यामध्ये कोको क्लबमध्ये भेटण्याबाबत भाष्य करण्यात आले होते. दीपिकाने या गोष्टी मान्य केल्या असल्या तरी ड्रग्जबाबत तिने अजून कोणते स्टेटमेंट दिलेले असून तिने म्हटले आहे की, आम्ही एखादी सिगरेट पितो पण ते खूप कॉमन आहे.
दरम्यान दीपिकाने तिच्या मॅनेजर करिश्माबरोबर हे चॅट केले होते. त्या करिश्माची देखील वेगळी चौकशी सुरू आहे. दोघींना देखील वेगळ्या खोल्यांमध्ये बसवून चौकशी करण्यात आली. दीपिकाने हे मान्य केले आहे की जे ड्रग चॅट समोर आले आहे ते तिचेच आहे. पण चॅटमधून तिने Doob मागितले असल्याचे तिने म्हटले आहे. तिने असे म्हटले आहे की Doob म्हणजे ते एक प्रकारची सिगारेट पितात. मात्र तिने अनेक प्रश्नांची उत्तरं देण टाळलं आहे.