ऑक्सफोर्ड लशीचा केइएम रुग्णालयात 3 जणांना दिला डोस

 

मुंबई,वृत्तसंस्था । देशात शहरांसह ग्रामीण भागांत कोरोनाच्या संसर्गात वाढ होत आहे. यातच रशियाने लस शोधली असतांना जागतिकस्तरावर या लशीच्या कार्यक्षमतेविषयी शंका उपस्थित करण्यात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सफोर्डच्या लशीबाबत चर्चा रंगत असून या लशी पुन्हा एकदा चाचणी सुरु झाली असून मुंबईतील केईएम रुग्णालयातील तिघांना या लसीचा डोस दिला जाणार आहे.

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील KEM रुग्णालयातील तीन जणांवर मानवी चाचणी शनिवारी करण्यात येणार आहे. या चाचणीचे तीन जणांवरील परिणाम आणि निकाल काय येतात याकडे अवघ्या मुंबईसह जगाचं लक्ष लागलं आहे. केईएम हॉस्पिटलचे डीनने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोना विषाणूची विकसित केलेली कोविशिल्ट लस रुग्णालयात तीन व्यक्तींवर मानवी चाचणी केली जाईल.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस देण्याआधी 13 लोकांची तपासणी कऱण्यात आली होती. त्यातून 3 जणांची निवड करण्यात आली आहे. आजपासून मानवी चाचणीची प्रक्रिया केईएममधील 3 जणांवर सुरू होईल.

Protected Content