Home आरोग्य यावल येथे स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

यावल येथे स्वच्छता मोहिमेला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद


bannerimage 1525935226

यावल (प्रतिनिधी) येथील नगर परिषदेव्दारे ‘स्वच्छ भारत स्वच्छ महाराष्ट्र’ ही मोहीम राबवण्यात येत असुन या अभियानाला शहरवासीयांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ही स्वच्छता मोहीम यशस्वी होईल असा विश्वास मोहीमचे प्रमुख मार्गदर्शक पंकज पारधे यांनी व्यक्त केला आहे. यावल नगर परिषदच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहीमेला शहरातील सेवाभावी संस्था सावीत्रीबाई फुले बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्यातून प्रारंभ करण्यात आला आहे.

या मोहीमेत संस्थेच्पा कार्यकर्त्यांनी बसस्थानकापासुन जुना चोपडानाका, बुरूज चौक ते बोरावल गेट परिसर, बोरावल गेट ते देशमुख वाडा नगर परिषद मार्ग, डांगपुरा ते सुदर्शन चौक, नगीना चौक ते महाजन गल्लीमार्ग म्हसोबापर्यंत, याशिवाय विस्तारीत परिसरातील फालक नगर, आयशानगर, चांदनगर, पांडुरंग सराफनगर, विरारनगर आदी भागात साफसफाई केली. इतर भागात युद्धपातळीवर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहीमेतुन प्रमुख मार्गावरील व्यवसायीक शहरातील महीला यांना स्वच्छता राखण्याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले. ही स्वच्छता मोहीम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे महीला पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound