पारोळा प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते तथा होमगार्ड प्रभाकर पाटील यांनी कोरोनाचा भयावह आणि कठीण काळात कायदा व सूव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महिनाभर विशेष पोलीस अधिकारी म्हणून सावदा येथे विनामूल्य उत्तम सेवा बजावल्याने फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडून सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.
कोरोनाच्या भयावह स्तिथीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने काही निवडक प्रतिभावंत, कर्तबगार होमगार्डची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यात प्रभाकर पाटील यांचा समावेश करण्यात आला होता.त्यांनी काही काळ पारोळा येथे सेवा बाजावळ्यांतर सावदा येथे बंदोबस्त मागविण्यात आला होता. सावदा येथे प्रभाकर पाटील यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरत उत्तमप्रकारे महिनाभर विनामूल्य सेवा दिली. त्याचीच दखल घेत फैजपूरचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी विशेष सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. त्यांच्या या अभिनंदनीय कामगिरीबद्दल सर्वच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.