Home क्राईम खंडेरावनगरातून गाय चोरी प्रकरणी पोलीसात गुन्हा

खंडेरावनगरातून गाय चोरी प्रकरणी पोलीसात गुन्हा

0
38


जळगाव प्रतिनिधी । शहरातील खंडेराव नगरातील चंचल काशिनाथ मानकुंमरे यांच्या मालकीची सुमारे पन्नास हजार रूपये किंमतीची गाय अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्‍यात तक्रार देण्‍यात आली आहे.

चंचल मानकुंमरे हे खंडेराव नगरात कुटूंबियांसह वास्तव्यास आहेत. ९ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या मालकीची गाय ही घरासमोरून अज्ञात चोरट्याने चारून नेली. याच रात्री पिंप्राळा हुडको परिसरातूनही आणखी एकाची गाय चोरीला गेल्याचे चंचल यांनी सांगितले. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपुर्वी गुरांची चोरून चोरटी वाहतूक करून पाळधी येथील कत्तलखान्यावर नेत असल्याची माहिती जिल्हा पोलीसांना मिळाली होती. त्यावेळी पोलीसांनी पाळधी येथील कत्तलखान्यावर धाड टाकून सुमारे २२ गुरांची सुटका केली होती. या सुटका केलेल्या गायींमध्ये चंचल मानकुंमरे यांची गाय होती.


Protected Content

Play sound