Home आरोग्य बहिणाबाई कोविड केअर सेंटरला ललित कोल्हे यांची सदिच्छा भेट

बहिणाबाई कोविड केअर सेंटरला ललित कोल्हे यांची सदिच्छा भेट

0
110


 

 जळगाव विशेष प्रतिनिधी । लेवा पाटीदार सोशल फाऊंडेशन व लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार झालेल्या बहिणाबाई कोविड केअर सेंटरला मनपाचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनी आज सदिच्छा भेट दिली.

या भेटीत ललित कोल्हे यांनी कोविड सेंटरमधील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. रुग्णांना दिले जाणारे जेवण, डॉक्टर स्टाफ, वैद्यकीय अधिकारी, तसेच कोविड-१९ बाधित रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद त्यांनी साधला. कोविडच्या रुग्णांना दिले जाणारे जेवणाचा कोल्हे यांनी आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत चंदन कोल्हे, सचिन धांडे, संदिप पाटील, प्रमोद पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

 बहिणाबाई कोविड सेंटर हे विनामूल्य असून तिथे असणाऱ्या सोयीसुविधा उत्तम असल्याचे समाधान यावेळी ललित कोल्हे यांनी व्यक्त केले, असे जनसंपर्क व प्रसिद्धी विभागाचे तुषार वाघुळदे यांनी कळविले आहे.

 


Protected Content

Play sound