Home Cities रावेर रावेर तालुक्यात पावसाचा तडखा; विज पडून महिला जागीच ठार

रावेर तालुक्यात पावसाचा तडखा; विज पडून महिला जागीच ठार

0
31


 

रावेर, प्रतिनिधी। तालुक्यात सुलवाडी येथे विज पडून ३२ वर्षीय महिला जागीच ठार झाल्याची दुर्दवी घटना आज सकाळी अकराच्या सुमार घडली आहे.

या बाबत वृत्त असे की, रावेर तालुक्यात सकाळी अकराच्या सुमारास जोरदार विजांच्या कडकडयात पावसाला सुरुवात झाली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुलवाडी येथील आशाबाई महानुभाव या आपल्या शेतात गेल्या होत्या. यावेळी पावसाला सुरुवात होऊन त्यांच्या अंगावर अचानक विज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान याबाबत रावेर तहसीलदारांकडून घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या दुरध्वनीवर संपर्क होऊ शकला नाही


Protected Content

Play sound