एरंडोल , प्रतिनिधी । येथील तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे मंदिरे सुरु करा या मागणीसाठी एरंडोल येथील मारुती मढी येथे ‘दार उघड उद्धवा दार, उघड मंदिर उघडा मंदिर अशा घोषणा देत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
एरंडोल तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसह युवा मोर्चा एरंडोल तालुका तर्फे धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणी बद्दल दोषींवर कडक कारवाई करण्याबाबत एरंडोल नायब तहसीलदार एस.पी. शिरसाट यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी एरंडोल तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष रविंद्र महाजन, शहराध्यक्ष निलेश परदेशी, तालुका युवा अध्यक्ष प्रशांत महाजन, उपाध्यक्ष निखिलेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष कल्पेश पाटील, सरचिटणीस प्रदीप महाजन, विलास महाजन, गणेश पाटील तसेच युवा मोर्चाचे कार्यकर्ते व भाजपा तालुका कार्यकर्ते उपस्थित होते.