जळगाव प्रतिनिधी । काल (दि.२८) रोजी सकाळी ८.०० वाजता वाघूर धरणाची पाणी पातळी २३३.८०० मी. वर पोहचली असुन धरणसाठा क्षमतेच्या ९७.२० टक्के झालेला आहे अशी माहिती वाघूर धरण उपविभाग क्र.१, चे उप अभियंता यांच्याकडून देण्यात आली. वाघूर धरणातून वाघूर नदीमध्ये अतिरिक्त ठरलेले पाणी सोडण्याची वेळ कधीही येऊ शकते असे सांगत या कार्यालयाने नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे
आगामी काही दिवस धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा पूर्ण संचय पातळी ) २३४.१०० मी. च्या जवळपास पोहोचलेला आहे. धरणामध्ये पाण्याचा अतिरिक्त ओघ येणे सुरु झाल्यास तात्काळ धरणाची वक्रद्वारे उघडुन वाघूर नदीमध्ये कोणत्याही क्षणी विसर्ग सोडावा लागेल. त्यामुळे वाघुर नदीला पुर येण्याची शक्यता आहे.
उप अभियंता कार्यालयाने वाघूर नदी काठच्या सर्व गावातील नागरिकांना दक्षता व सावधानतेचा इशारा दिला आहे. निवासी उप जिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी भुसावळ आणि जळगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जळगाव, भुसावळ आणि जामनेर च्या तहसीलदार्रांना या सावधानतेची माहिती दिली आहे .