मुंबई (वृत्तसंस्था) तृतीयपंथी समाजाच्या नेत्या प्रिया पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रिया पाटील यांना नियुक्त पत्र देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले.दरम्यान, प्रिया पाटील यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी सदस्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रिया पाटील यांचे पक्षात मनापासून स्वागत केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही या ट्रान्सजेन्डर जातीसाठी काम केले असून त्यात प्रिया पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. 377 बिलच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहिली आहे. यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, यवतमाळच्या महिला नेत्या क्रांती थोटे, प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, महेश चव्हाण उपस्थित होते.