परीक्षा घेण्याच्या परिपत्रकाची होळी : काँग्रेसतर्फे केंद्र सरकारचा निषेध (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । केंद्र सरकारने अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशाच्या परीक्षा जेईई व नीट पुढील महिन्यात घेण्याचा निर्णय विरोधात काँग्रेसतर्फे बीएसएनएल ऑफिस बाहेर परीक्षा घेण्याच्या परिपत्रकाची होळी करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

कोरोनाच्या महा संकटामध्ये विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकण्याचा हा केंद्र सरकारचा निर्णय आहे. केंद्र सरकारच्या या विद्यार्थी हिताविरोधातील निर्णयाच्या विरोधात आज केंद्र सरकारच्या शासकीय कार्यालयासमोर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष संदीप पाटील जळगाव यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या परीक्षा घेण्याच्या संदर्भातील परिपत्रकाचा होळी करून निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी जळगाव जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निदर्शनं करण्यात आली.

कोरोना कालावधीत सार्वजनिक वाहतूक बंद असताना जिल्हा ठिकाणच्या परीक्षा केंद्रावर ती विद्यार्थी कसे पोहोचणार..?, सर्वच पालकांची खाजगी वाहनाने परीक्षा केंद्रावरती येण्या इतकी आर्थिक परिस्थिती सक्षम आहे का..?, परीक्षा केंद्रावर ती विद्यार्थ्या सहित त्याचे पालक म्हणजेच एका विद्यार्थ्यांमागे किमान दोन व्यक्ती इतकी गर्दी झाल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होणार नाही का..?, परीक्षा काळात विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्याच्या होणाऱ्या आरोग्याच्या व शैक्षणिक नुकसान अस कोण जबाबदार राहणार..? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या संदर्भामध्ये केंद्र सरकारने स्पष्टीकरण द्यावे, अन्यथा परिक्षा केंद्र बंद पाडण्यात येतील असा इशारा देण्यात आला याप्रसंगी एनएसयूआय जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, श्याम तायडे, अमजद पठाण, जगदीश गाडे, प्रदीप सोनवणे, जमील शेख, सुलोचना वाघ, जाकिर पठाण, दिपक सोनवणे, मुन्नवर खान, मनोज सोनवणे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/327101878626902/

 

Protected Content