एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील विखरण व रिंगणगाव या दोन्ही गावात गावकऱ्यांनी पो.नि. स्वप्निल उनवने व सपोनि तुषार देवरे यांच्या आवाहनास प्रतिसाद देत यंदा कोरोनाच्या पार्श्वूमीवर गावात सार्वजनिक गणपती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे.
आज २६ ऑगस्ट २०२० रोजी विखरण व रिंगण गाव या दोन्ही गावात जरी सार्वजनिक गणपती बसवला नसला तरी एरंडोल पोलीस प्रशासनाच्या साहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विखरण येथे ३१ व रिंगणगाव २६ एकुण ५७ जणांनी रक्तदान केले.
यावेळी एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार देवरे, राहुल पाटील, विखरण येथे सरपंच व ग्रा.पं.सदस्य, ग्राम विस्तार अधिकारी अहिरे, उमेश देसले, डॉ.राजेंद्र देसले, योगराज महाजन व रिंगणगाव येथे पोलीस पाटील वासुदेव मोरे, ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र पाटील, ग्रामसेवक अंकुश पाटील व दोन्ही गावातील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरासाठी सहकार्य केले.