यावल नगर पालिकेतर्फे मोकाट जनावरे जेरबंद करण्याच्या मोहिमेस प्रारंभ

 

यावल, प्रतिनिधी । शहरातील मोकाट फिरणाऱ्या गुरढोरांमुळे वाहन चालकांपासुन तर नागरीकांसाठी डोके दुःखी ठरलेली व शहरवासीयांसाठी मोठा त्रासदायक असणारी बेवारस गुरढोरे पकडण्याच्या मोहीमेस नगर परिषदने सुरूवात केली आहे

यावल नगर परिषदेच्या सभागृहातअनेक सर्वसाधारण सभेत वारंवार या मुकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न चर्चेला येत असे असतांना मात्र नगर परिषद प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याची यावलकरांची ओरड होती. मागील दिवसांपासून या षयी प्रसार माध्पमांतुन अनेक वेळा वृत्त देखील प्रसिद्ध करण्यात आले होते अखेर नागरीकांच्या व वाहनधारकांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची नगर परिषद प्रशासनाला जाग आल्याचे दिसुन येत आहे .

यावल शहरातील प्रमुख बुरूज चौक , भुसावळ टी पॉईन्ट , बसस्थानक परिसर , जुने भाजीबाजार चौक , आठवडे बाजार परिसर अशा नागरी वर्दळीच्या मार्गावर नियमीत ही मोकाट फिरणारी जनावरांमुळे रहदारीसमोठी अडचण व समस्या निर्माण होत असे , आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास यावल नगर परिषदचे पाणी पुरवठा विभागप्रमुख रमाकांत मोरे , स्वच्छता विभागप्रमुख शिवानंद कानडे आदी कर्मचारी यांच्या मार्गरर्शनाखाली नगरपरिषदने यावल शहरात फिरणारी मोकाट गुरेढोरे जमा करण्याची मोहिमेस प्रारंभ करण्यात आले.

Protected Content