नवी दिल्ली वृत्तसंस्था । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रकृती खालावली आहे. आर्मी रिसर्च अॅन्ड रेफरल रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रणव मुखर्जी यांच्या फुफ्फुसापर्यंत संक्रमण पोहचल्यानंतर त्यांची तब्येत अधिकच खराब झाल्याने चिंता वाढली आहे.
गेल्या १० ऑगस्टपासून ते रुग्णालयात दाखल आहेत. मेंदूवर झालेल्या शस्रक्रियेनंतर त्यांना व्हेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
रुग्णालयकाडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, माजी राष्ट्रपतींना सध्या व्हेन्टिलेटरद्वारे कृत्रिम श्वासोच्छवास दिला जातोय. तज्ज्ञांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवून आहे.
एक दिवसापूर्वी राष्ट्रपतींचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी ट्विट करून आपल्या वडिलांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटलं होते. ‘तुमच्या सगळ्यांच्या शुभकामना आणि डॉक्टरांच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे माझ्या वडिलांची प्रकृती आता स्थिर आहे.
त्यांचे स्वास्थ्य नियंत्रणात आहे आणि त्यांच्यावर देखरेख ठेवण्यात येतेय. त्यांच्या प्रकृतीत सकारात्मक संकेत पाहायला मिळालेत. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करण्याची विनंती करतो’ असं भावूक ट्वविट अभिजीत मुखर्जी यांनी केले होते.