Home प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकार्‍यांच्या दौर्‍याकडे रावेरकरांचे लक्ष

जिल्हाधिकार्‍यांच्या दौर्‍याकडे रावेरकरांचे लक्ष

0
38

रावेर प्रतिनिधी । शांतता समितीच्या बैठकीसाठी आज रावेरात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत येत आहेत. सध्या तालुक्यातील काही महत्वाचे प्रश्‍न प्रलंबीत असून याबाबत ते महत्वाची घोषणा करतील का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आगामी गणेशोत्सव व मोहरम सणां निमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आज रावेरात शांतता कमेटीच्या बैठकीला येत आहे. आज दुपारी ही बैठक होणार आहे.

मागील कोविड सेंटरला भेट दिल्या नंतर दुसर्‍यांदा जिल्हाधिकारी रावेरात येतील मागिल वेळेस त्यांनी मका व कापुस खरेदी केंद्र लवकर सुरु करणार असल्याचे आश्‍वासन रावेरच्या जनतेला दिले होते. तसेच सोमवारी त्यांच्याच एका महसूल अधिकार्‍याने वाळूचे पकडलेले ट्रॅक्टर सोडल्याचे प्रकरण गाजत आहे. यावरून जिल्हाधिकारी श्री राऊत यांची प्रतिक्रिया महत्वाची ठरणार आहे.


Protected Content

Play sound