जळगाव प्रतिनिधी । शहरातील बळीराम पेठेत घरफोडी झाल्याचे १५ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आले होते. चोरी प्रकरणातील एका संशयित आरोपीस अटक केली होती. पोलीस कोठडीत असतांना त्याच्या ताब्यातील मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
याबाबत माहिती अशी की, योगेश काशीनाथ पवार (वय-४४) रा. बळीराम पेठ यांचे तीन मजली इमारत आहे. १४ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत जेवण करून तिसऱ्या मजल्यावर झोपण्यासाठी गेले. त्यावेळी खालच्या घराचा दरवाजा बंद केला होता. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी खालच्या घराचा दरवाज टॉमीने तोडून घरात प्रवेश करून घरातील कपाट फोडले.
कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या, दोन चांदीच्या मुर्त्या आणि ७ ते ८ हजार रूपयांची रोकड लंपास केली. असा एकुण ४३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.
दरम्यान, चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी अटक केलेला चोरटा रिजवान उर्फ काल्या गयासुद्दीन शेख (वय २२, रा.तांबापुरा) याला अटक करण्यात आली होती. अधिका चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी रिजवान याने चांदीच्या लक्ष्मीच्या मुर्त्या सोडून इतर सर्व मुद्देमाल पोलीसांना काढून दिला आहे.
चांदीच्या मुर्त्या ह्या फरार असलेला संशयित आरोपी काल्या याचा साथीदार समीर (पुर्ण नाव माहित नाही) याकडे आहे.