Home क्राईम जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थलांतरीत

जिल्हा रुग्णालयातील अपघात विभाग शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालयात स्थलांतरीत

jalgaon district hospital help to lady 2017099293
jalgaon district hospital help to lady 2017099293

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला अपघात विभाग हा पुढील आदेश होईपर्यत शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, जळगाव या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काढले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील रुग्णालय विशेष कोवीड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तसेच गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील मेडीकल कॉलेज व जनरल हॉस्पिटल, हे हॉस्पिटल अत्यावश्यक बाब म्हणून डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेला अपघात विभाग हा पुढील आदेश होईपर्यत शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, जळगाव या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात येत आहे.

या अपघात विभागात कार्यरत असलेले डॉक्टर्स यांची सेवा पुढील आदेश होईपावेतो शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय, जळगाव या ठिकाणी वर्ग करण्याबाबतची कार्यवाही येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news


Protected Content

Play sound