जळगाव, प्रतिनिधी । वीज दुरुस्ती विधेयक मागे घेण्यासाठी आणि खासगीकरचा निर्णय मागे घेण्यासाठी साबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्ह्यातील महावितरणाचे कर्मचारी व अधिकारी यांनी महावितरण कार्यालयासमोर सरकार विरोधात काळी फित लावून निषेध व्यक्त केला.
वीज दुरुस्ती विधेयक मागे घेण्यासाठी आणि खासगीकरचा निर्णयाविरोधात आज देशभरात साबोर्डीनेट इंजिनिअर असोसिएशनतर्फे काळी फित लावून कामकाज केले. संघटनेचे राज्य उपाध्यक्ष पराग चौधरी यांनी सांगितले की, केंद्र सरकाने जे नवीन वीज दुरुस्ती विधेयक आणले असून यातून महावितरणचे खासगीकरण करण्याचा कट दिसून येत असल्याचा आरोप केला आहे. या कटाला विरोध असल्याने काळी फिती लावून कामकाज केल्याचे श्री. चौधरी यांनी सांगितले. केंद्र सरकारने कोरोनाच्या संकटात वीज दुरुस्ती विधेयक आणून यातून उद्योगपतींना फायदा पोहचविण्याचा हेतू स्पष्ट दिसत आहे. केंद्रशासीत प्रदेशात खासगीकरण करण्याचे आदेश देण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. याप्रसंगी सर्कल सेक्रेटरी देवेंद्र भंगाळे, विभागीय सचिव मिलिंद इंगळे, विभागीय अध्यक्ष मयूर भंगाळे, आर एन शामकांत खोडपे व इतर अभियंते यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/353095775702162/