भुसावळ प्रतिनिधी । गत लोकसभा निवडणुकीत तरूणांनी मोठ्या प्रमाणात मोदींना मतदान करून विजयी केले असले तरी त्यांच्या सरकारने युवकांचा विश्वासघात केल्याचा आरोप आज प्रतिभा शिंदे यांनी केला.
लोकसंघर्ष मोर्चातर्फे आज भुसावळहून जळगावला बेरोजगारांचा मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभाताई शिंदे यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या की, गत लोकसभा निवडणुकीत तरूणांनी मोठ्या प्रमाणात मोदींना मतदान करून त्यांना विजयी केले. मात्र मोदींनी तरूणांचा विश्वासघात केला. याचाच निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आल्याची माहितीदेखील प्रतिभाताई शिंदे यांनी दिली.
पहा : प्रतिभाताई शिंदे नेमक्या काय म्हणाल्या त्या !