Home आरोग्य ब्रेकिंग न्यूज : अमित शहा कोरोनामुक्त !

ब्रेकिंग न्यूज : अमित शहा कोरोनामुक्त !


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनामुक्त झाले आहेत. स्वतः शहा यांनी ट्वीटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

अमित शहा कोरोनामुक्त झाल्याचे भाजपा नेते मनोज तिवारी यांनी चार दिवसापूर्वी ट्विट केले होते. परंतू थोड्याच वेळात तिवारींनी ते ट्वीट डिलीट केले होते. त्यामुळे शहा कोरोनामुक्त झाल्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आज अमित शहा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मी ईश्वरचे धन्यवाद मानतो. तसेच या कठीण समयी ज्या लोकांनी माझ्या तव्येत बरी होण्यासाठी शुभकामना दिल्या. माझ्या आणि माझ्या परिवाराचे मनोबल वाढवले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणखी काही दिवस घरी आइसोलेशनमध्ये राहील, असेही अमित शहा यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.


Protected Content

Play sound