पुणे (वृत्तसंस्था) या सरकारमध्ये इतकी खुन्नस काढली जातेय, की आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामंही होत नाहीत. म्हणून आमदार पवारांना भेटतात. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले असा होत नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
सहा वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक असल्याचा दावा राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनी केला होता. त्यावर मुळात भाजपचा कोणताही आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही. या सरकारमध्ये इतकी खुन्नस काढली जातेय, की आमदारांच्या मतदारसंघातील विकासाची कामंही होत नाहीत. म्हणून आमदार पवारांना भेटतात. विकासकामे मार्गी लावण्यासाठी पवारांकडे आग्रह धरावा लागतो. याचा अर्थ भाजपचे आमदार तिकडे चालले असा होत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. शरद पवार आणि महाविकासआघाडीचे नेते हे केवळ त्यांच्या आमदारांचा आत्मविश्वास वाढवत आहेत. भाजपच्या १०५ आमदारांपैकी ८० जण तिकडे जातील, ही सोप्पी गोष्ट वाटते का?, असाही सवाल त्यांनी उपस्थित करत राष्ट्रवादीच्या दाव्याची खिल्ली उडवली.