रावेर (प्रतिनिधी)। रावेर शहराचा हद्दवाढीच्या प्रस्तावाला अखेर आज मंजूरी मिळाली असुन याबाबत अधिकृत शासन निर्णय नुकताच निघाला आहे. यामुळे नगर पालिका हद्दी बाहेरील वसाहतींचा आता विकास होणार आहे. नगर पालिका वसाहतीच्या बाहेरील नागरीक नगराध्यक्ष, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार हरिभाऊ जावळे यांचे आभार व्यक्त करीत आहे
यामुळे रावेरकरांनी आनंदोत्सव साजरा करण्यात येत असुन गेल्या आठवड्यात मुंबई येथे नगरविकास मंत्रालयाचे उपसचिव कैलास बधान यांनी तिघाही नगर पालिकेचे सीईओ यांच्या सोबत आढावा घेवून सकारात्मक चर्चा केल्याने आज अखेर हद्दवाढ झाल्याची आदेश प्राप्त झाले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनीही समक्ष भेट देत पाहणी करून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी निकालात काढून शहर हद्दवाढीच्या प्रस्तावाचा पाठपुरावा करून कार्यवाही गतिमान केली होती. मुख्याधिकारी यांनी त्रुटीविरहीत शहर हद्दवाढीच्या प्रस्तावाला विलंब होवू नये म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाची शिफारस घेऊन प्रत्यक्ष मुंबईला मंत्रालयात जावून दाखल केला होता. अनेक वर्षांपासून धुळखात पडलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला अखेर नगराध्यक्ष दारा मोहोम्मद असतांना मंजूर झाल्याने त्यांना शहरात प्रचंड सहानुभूती मिळत आहे. नगर पालिका बाहेरील वसाहतीमधील नागरीक नगराध्यक्ष दारा मोहोम्मद व त्यांच्या टीमचे आभार व अभिनंदन करीत आहे.