जळगाव (प्रतिनिधी)। संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मोर्चा सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास काढण्यात आला. यावेळी विविध समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आहे त्या आरक्षणात 10 टक्के अतिरिक्त आरक्षण दिल्याच्या निषेर्धार्थ हो मोर्चा काढण्यात आला होता.
राज्य आणि केंद्र सरकारने अवघ्या सात दिवसात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केले. मात्र इतर समाज आरक्षणाच्या मागण्या अनेक महिन्यांपासून आरक्षणापासून वंचित राहत आहे. ज्यांनी मोर्चा कधीच काढला नाही त्यांना आरक्षण तत्काळ मंजूर करावे, यात अनेक समाजांचा समावेश आहे, आरक्षण ही भीक किंवा गरीबी निर्मूलन नाही, खऱ्या गरजू व्यक्तींना आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांना आरक्षण द्यावे, 79.2 आरक्षणात असतांना अतिरीक्त 10 टक्के देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शासनाने घेतलेल्या निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे यावेळी संविधान बचाओ संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले.
पहा– संविधान बचाओ आरक्षण समितीच्या मोर्च्याबाबत व्हिडीओ.