चाळीसगाव (प्रतिनिधी)। येथील बि.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स, के.के.सी कॉमर्स महाविद्यालयातील इंग्रजी विभागातर्फे आयोजीत टीचर ट्रेनींग कार्यशाळा हेरिसन पब्लिक इंग्लिश मिडीयम स्कूल येथे घेण्यात आले.
कार्यक्रमात स्कूलचे मुख्याध्यापिका व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमांसाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सलमान पठाण तसेच शिक्षकांना मार्गदर्शन प्रा.आर.आर.बोरसे व प्रा.सौ.पी.बी सोनवणे केले तर आभार मनोगत प्रतिभा पटिल यांनी केले. तसेच महाविद्यालयाचा इंग्रजी विभागातील विद्यार्थीचे ही सहभाग कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी होता.