नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.
राम मंदिरासोबतच देशात रामराज्य येणार असे बाबा रामदेव यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजचा दिवस हा एक ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस कायमच सर्वांच्या लक्षात राहील. मला खात्री आहे की, राम मंदिरामुळे देशात ‘रामराज्य’ स्थापित होईल, असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराची कोनशिला रचली जाईल. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.